
मुंबई : कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्याापसून मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

24 आणि 25 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे.कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारपासून (२३ जून) मोसमी पाऊस सुरू होईल. २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तविला आहे.
