बहिरेश्वर येथे ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आली

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेतील आरक्षण सोडती लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आल्या.

त्यापैकी बहिरेश्वर ग्रामपंचायत साठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण अगोदरच निश्चित करण्यात आले आहे तर उर्वरित प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत आज बहिरेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात काढण्यात आली…बहिरेश्वर ग्रामपंचायत साठी एकुण 2700 मतदार एकुण चार प्रभागात रचना करण्यात आली आहे. 11 सदस्यासाठी आरक्षण सोडत आज लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आली.

प्रभाग क्रमांक 1 साठी

एकुण जागा 3 आरक्षित असून त्यापैकीसर्वसाधारण पुरुष 1 अनु.जा.ज.सर्वसाधारण 1 सर्वसाधारण महिला 1. असे तरप्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 3 जागेसाठी ओ.बी.सी महिला 1सर्वसाधारण महिला 2 असे तरप्रभाग क्रमांक 3. साठी एकुण 2 जागा त्यापैकीअनु.सुचित महिला 1सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1 तर प्रभाग क्रमांक 4. साठी एकुण ..3 जागापैकीओ.बी.सी.सर्वसाधारण 1 सर्वसाधारण महिला 1सर्वसाधारण प्रवर्ग 1 असे आरक्षण निश्चित करण्यात आले एकुण 11 जागा पैकी 6 महिला तर 5 पुरूष या निवडणुकीत उतरणार आहेत.सदरची प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत कसबा बीडचे मंडल अधिकारी प्रवीण माने,तलाठी सुवर्णा भोईर,ग्रामसेवक जयश्री लाटकर सरपंच युवराज दिडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारूती दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली…. यावेळी गावातील सेवा संस्थाचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706