आदिपुरुष सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

नवी दिल्ली : आदिपुरुष चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादात आता शिंदे गटानेही उडी घेतली असून शिंदे गटाच्या खासदाराने मोठी मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आदिपुरुष सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

आदिपुरुषमुळे भारताची बदनामी होत असल्याचा दावा श्रीरंग बारणे यांनी केला आहे. श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रसून जोशी यांना पत्र लिहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सिनेनिर्मात्याची चांगलीच कोंडी झाली आहे. तर शिंदे गटाच्या या मागणीने भाजपचीही कोंडी झाली आहे. भाजपचे खासदार आणि अभिनेत रवी किशन यांनी या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. हा सिनेमा आजच्या पिढीशी सुसंगत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

🤙 8080365706