
मुलांना सकाळी गाढ झोप लागलेली असते आणि त्यांना अजिबात उठायचं नसतं. उठले तरी ते अर्धवट झोपेत असल्याने त्यांना आवरायचं नसतं. मग पालकांची खूप तगतग होते आणि मुलांचीही रडारड सुरू असते. हे सगळं रोज झालं की आपल्याला त्याचा कंटाळा येतो. यावर उपाय म्हणून आणि मुलांना वेळेत तयार करण्यासाठी एक खास उपाय आज आपण पाहणार आहोत.

मुलांना सकाळी तयार करण्यासाठी आपण त्यांना झोपेतून उठवणं ठिक आहे. पण जर ते ६ किंवा ७ वर्षापेक्षा मोठे असतील तर त्यांच्या मागे मागे फिरुन त्यांचे सगळे करु नका. तुम्हाहा तुमचं सगळं करायचं आहे आणि वेळेत आवरायचं आहे हे मुलांना एकदाच नीट सांगा. त्यांचं त्यांना खायचंय, ब्रश-आंघोळ, कपडे घालणे सगळं त्यांना करायचंय हे त्यांना पटवून द्या. तसंच शाळेत वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे जर उशीर झाला आणि शाळेत शिक्षा झाली किंवा पुन्हा घरी यावं लागलं तर त्याची जबाबदारी मुलांचीच आहे हेही त्यांना पटवून द्या. हरप्रीत सांगतात आम्ही आमच्या मुलीवर हा प्रयोग केला. ती वेळेत तयार होते आणि आम्हालाच आम्ही तयार नसल्याचं सांगते.
