
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३०जुलै रोजी मतदान होणार असून ३१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी तयारी दाखवली आहे. पण उमेदवारी माघारी तारखे नंतरच निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे चित्र स्पष्ट होईल. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उद्या मंगळवारपासून (दि.२०जुन) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून ३०जुलैला मतदान होणार आहे तर ३१जुलैला मतमोजणी होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी एन पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे. तसेच कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनीही बिनविरोधासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र निवडणूक लागल्यास दोन्हीकडे कडूनही ताकदीने निवडणूक लढवली जाणार आहे . निवडणूक कार्यक्रम असा आहे २० ते २७ जुन या कालवधीत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत तर २९ जुन रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. पात्र उमेवाराच्या नावांची यादी ३०जुन रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १४ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असणार आहे. त्यांतर १७ जुलैला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
