
बालिंगे : बालिंगे (ता. करवीर) ग्रामपंचायत अंतर्गत अनेक कॉलन्या आहेत, या कॉलन्या मूळ गावठाणापासून दूर असल्या तरी गेल्या दोन वर्षात तिथे विकास पोहचवण्याचे काम केले. येथील कॉलन्या सोयी सुविधांच्या माध्यमातून माॅडेल करणार, अशी ग्वाही बालिंगा गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य मयुर मधूकर जांभळे यांनी दिली.

बालिंगे अतंर्गत कोर्ट कॉलनी व विघ्नहर्ता कॉलनी येथे रस्ता डांबरीकरण प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभ राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सचिन माळी होते.
सदस्य संदीप सुतार, विजय जांभळे, नंदकुमार जांभळे, धनंजय ढेंगे, ॲड. दत्ताजी कवाळे, सुमीत डोर्ले, समीर मकानदार, विनायक भंंडारी, चंद्रकांत शिंदे, एम. एस. पाटील, लक्ष्मण पाटील, संजय भोसले, गंगाराम कोटकर, किशोर आंग्रे, राहुल गवळी, शशांक पोतदार आदी उपस्थित होते.
