एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवलेलं तरुणीचा राजगडावर सापडला मृतदेह

राजगड : राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटकावलेल्या (आरएफओ) २६ वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे.

राजगड किल्यावर गुराख्याला एक सडलेला मृतदेह आढळला. गुंजवणे गावचे पोलिस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानुसार सहायक निरीक्षक मनोज पवार, हवालदार औंदुबर अडवाल, ज्ञानदीप धिवार, योगेश जाधव आदी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाजवळ मोबाइल आणि चप्पल सापडली. त्यावरून तक्रारदार वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

🤙 8080365706