
बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील शिरोली दु येथे तुळशी सहकार समुहाचे दिवंगत नेते कै शिवाजीराव कृष्णा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्य भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

याप्रसंगी १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. राजाराम सहकारी साखर कारखाना चेअरमन, माजी आमदार, अमलजी महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला… यावेळी तुळशी समुहाचे नेते सरदार पाटील, यशवंत बॅकेचे चेअरमन एकनाथ पाटील, संचालक प्रकाश देसाई, दादासाहेब देसाई, दिलीप खाडे,माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, विरशैव बॅकेचे संचालक अनिल सोलापूरे इ मान्यवर उपस्थित होते.
