
कोल्हापूर: फादर डे हा जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो आज रविवार 18 जून रोजी फादर डे असल्याने वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्यावतीने महावीर गार्डन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

फादर्स डेला मुलं आपल्या प्रेमळ वडिलांना खास भेटवस्तू देतात आणि आनंद आणि उत्साहात त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात.भारतात तर आईवडिलांशी मुलांचा कनिष्ठ नाते संबध असतो. ज्यामुळे अगदी लहानपणापासून ते स्वतः पालक होईपर्यंत मुलांवर वडिलांचे छत्र कायम असते. ज्यामुळे पितृदिन हा भारतात एक सण अथवा समारंभापेक्षा नक्कीच कमी नाही. वडील आईप्रमाणे बाळाला पोटात सांभाळले नाही अथवा त्याला जन्म देण्यासाठी प्रसूतीवेदना सहन केल्या नाही तरी ते त्यांच्या संगोपनाची खूप मोठी जबाबदारी आयुष्यभर स्वीकारतात. मुलांच्या जीवनात त्यांना वेळोवेळी मानसिक आधार आणि आर्थिक सहकार्य करण्यात वडिलांचा मोठा वाटा असतो. मुलांना आई-वडिलांचा आदर ठेवणे तसेच आपली संस्कृती जपत राहण्यासाठी आपल्यावर केलेल्या संस्काराची जाणीवता,व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वुशू संघटनेने हा उपक्रम आयोजित केला होता. असे संघटनेचे उपाध्यक्ष सतिश वडणगेकर यांनी बोलताना व्यक्त केले. याफादर्स डे मध्ये मुलांनी आपल्या वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी खेळाडू पालक उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे नियोजन गणेश पडवळ, भूषण जाधव यांनी केले होते.
