
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

त्यांनी काही दिवसांपूर्वीच तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये भावी खासदार हर्षवर्धन जाधव असा मजकूर असलेले बॅनर झळकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैदराबादमध्ये जाऊन तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. आगमी लोकसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीआरएसकडून सध्या राज्यात जोरदार तयारी सुरू आहे.
