
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. तर आज मनिषा कायंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे या आक्रमक नेत्या आहेत. जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा त्यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडली. शिवसेनेची ढाल म्हणून त्या कायम विरोधकांसमोर उभ्या राहिल्या. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. शिवसेना ठाकरे गटाच्या अभ्यासू आणि आक्रमक नेत्या ही त्यांची ओळख आहे. त्यामुळे मनिषा कायंदे यांच्या शिवसेनेत जाण्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.
