कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची नोहेंबर मध्ये शक्यता – खास. धनंजय महाडिक

कोल्हापूर : जवळपास अडीच वर्षे लांबणीवर पडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबर २०२३ मध्ये होण्याची शक्यता असल्याची खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शहरवासियांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीला सत्ता द्यावी. कोल्हापूर शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. येत्या तीन-चार महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नोव्हेंबर मध्ये महापालिका निवडणूक होईल असे वाटते. महापालिकेत गेली पंधरा वर्षे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु त्यांनी शहर विकासासाठी भरीव काम केले नाही. शहराशी निगडीत सगळे प्रश्न जैसे थे आहेत. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची उभारणी झाली नाही. अशी टीकाही महाडिक यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर वर केली.कोल्हापूरकरांनी महापालिकेची सत्ता भाजप आणि शिवसेनेकडे सोपविल्यास कोल्हापूर शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करू अशी ग्वाही देत महाडिक म्हणाले, “राज्य सरकारने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी 78 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून वेगवेगळी कामे करू. खासदार धनंजय महाडिक म्हणाले कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरून निधी आणण्याचा आमचा निर्धार आहे. उपलब्ध निधीतून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एक अभिनव योजना केली आहे. शहरातील नागरिकांनी त्यांच्या प्रभागात कोणती विकासकामे व्हावी यासंबंधी मागणी करावी नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील सर्व 81 प्रभागात विकास कामे केली जातील. नागरिकांनी प्रभागातील प्राधान्याने आणि तातडीने करावयाच्या विकास कामांची माहिती खासदार महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात व नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी माजी आमदार अमल महाडिक, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, भाजपचे प्रदेश सदस्य महेश जाधव, संग्राम निकम, पृथ्वीराज महाडिक, अवधूत अपराध आदी उपस्थित होते.

🤙 8080365706