अखेर आळंदी मंदिर प्रशासनाने मौन सोडले

पुणे : आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. प्रकरानंतर पाच दिवसांनी आळंदी मंदिर प्रशासनाने मौन सोडले आहे.

हा प्रकार कसा घडला अन् कसा टाळता आला असता, हे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे. पालखी प्रस्थनाला सुरुवात होत असताना जोग वारकरी शिक्षण संस्थेतील ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेश घेण्यासाठी आले. या विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेशासाठी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यातील ३५ जणांना प्रवेश देण्याचे मान्य केले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी बळजबरीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि पुढची कारवाई झाली. विद्यार्थी सामंज्यस्याने वागले असते तर हे घडले नसते असं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलंय.

🤙 8080365706