धावत्या ट्रेनमध्ये पीडित मुलीवर अत्याचार केला त्याच दिवशी त्याने आणखी पाच महिलांवर अत्याचार

मुंबई : मुंबईत धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला त्याच दिवशी त्याने आणखी पाच महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे धक्कादायक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

पोलिस तपासादरम्यार आरोपीचे भयानक कृत्य उघड झाले आहे. धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळधावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. परीक्षेला जाणा-या एका 20 वर्षीय युवतीवर हा लैंगिक अत्याचार झाला आहे. 14 जून रोजी सकाळी 7.28 वाजता ही विद्यार्थिनी सीएसएमटी पनवेल या लोकलच्या सेकंड क्लास डब्यात चढली. सीएसएमटी स्थानकातून या तरुणीने लोकल पकडली होती. ट्रेन सुरू होताच आरोपी या डब्यात चढला आणि त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू केला. विद्यार्थिनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. एका वृद्ध महिलेने बचावासाठी पुढे येत पोलिसांना फोन करण्याचा इशारा दिला. मात्र आरोपीने त्यालाही दाद दिली नाही. मशीद बंदर स्टेशन येतात विद्यार्थिनीने ट्रेनमधून खाली उतरत स्वतःची सुटका करून घेतली. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी करीम नवाजला 8 तासांत अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🤙 8080365706