शियेगावामध्ये एका वर्षात ५ग्रामसेवक : ग्रामस्थ हैराण

बालिंगा : शिये तालुका करवीर या गावामध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या कानाडोळ्यामुळे ग्रामसेवकांच्या सततच्या बदल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरं जावे लागत असल्याने गांवामध्ये असंतोष पसरला आहे.

गतवर्षी एप्रिल महिन्यात तात्कालीन ग्रामसेवक रमेश कारंडें यांच्या लाखो रूपयांच्या कथीत अपहारावरून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे व कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून व आंदोलनांची दखल घेवुन करवीर गटविकास अधिकारी यांनी नेमलेल्या तीन विस्तार अधिकार्यांच्या समितीने सखोल तपासाअंती भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला होता. यांसह या मोठ्या गैरव्यवहाराला सदस्यांनाही जबाबदार धरत ग्रामपंचायतीवर कारवाईची शिफारस जि.प.कडे केली होती.याची गंभीर दखल घेत सीईओ यांनी शिये ग्रामपंचायत बरखास्तीसाठी निर्देश होऊन मिळण्यासाठी पूणे आयुक्तांकडे शिफारस यापूर्वीच केली असून कारवाई प्रलंबित आहे.

दरम्यान आपला रितसर कार्यभार न देता रमेश कारंडे यांनी बालिंगा व कांचनवाडी येथे बदली करून घेतली आणि त्यांचे काळात च बालिंगा ग्रामपंचायत मधील कागदपत्रे जळाली. यावेळी एप्रिल ते जून पर्यंत गावाला ग्रामसेवकच नव्हता.यावेळी जुलै २०२२मध्ये कोथळी गावचा कार्यभार असलेल्या सतीश पानारी यांच्याकडे चार्ज पट्टी न होताच शियेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.परंतू येथील तात्कालीन गैरव्यवहाराच्या चौकशीचा ससेमिरा , नागरीकांच्या तक्रारी व भ्रष्टाचाराविरुद्ध होणारी आंदोलने यातून आरोग्याचे कारण पुढे करत व सतत गैरहजर राहात एप्रिल २०२३नंतर शिये सोडले.दरम्यान या आठ दहा महिन्यांत नागरीकांची प्रचंड गैरसोय होऊन अतोनात हाल झाले.या तक्रारींनतर फक्त दाखले देण्यासाठी निगवेचे संजय शिंदे यांचेकडे तात्पूरते काम दिले.तेही निघून गेल्यावर १९मे २३ला निलेश कुंभार येथे हजर झाले व १२जून रोजी त्यांनी ग्रामसभा ही हाताळली होती, आणि याच दिवशी ४वा.सभा संपली आणि तानाजी पाटील यांची येथे नियुक्ती झाली आहे.विशेष म्हणजे कारंडे पासून रितसर चार्जपट्टी न होताही इतके अधिकारी बदलले असल्याचे बोलले जात आहे.

या गोंधळात गावक-यांचे मात्र हाल होत आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून शियेसाठी कायमस्वरूपी, पूर्णवेळ व भ्रष्टाचारमुक्त काम करणारा ग्रामसेवक नेमावा अशी मागणी होत आहे. तसेच ग्रामसेवकांनी भ्रष्टाचार मुक्त कारभार केला तर अशा ग्रामसेवकांचा एका वर्षानंतर शिये गावांमध्ये डिजिटल पोस्टर लावून व त्यांना फेटा घालून, आहेर करून, फटाक्यांची आतषबाजी करून, सत्कार सोहळा करू अशी ग्वाही शेतकरी संघटनेचे नेते दे ॲडव्होकेट माणिक शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.

🤙 8080365706