वजन नियंत्रित ठेवणारे पदार्थ…..

सुरूवातीलाच वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवलं नाही तर ही समस्या गंभीर होऊ शकते. शारीरिक व्यायाम, खाण्यापिण्यात सुधारणा केल्यास वजन नियंत्रणात राहू शकतं. तर जाणून घेऊयात वजन नियंत्रित ठेवणारे कोणते पदार्थ आहेत.

बीया  आणि फळं भाज्यांमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असतात. फॅट आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. म्हणून भाज्यांच्या सेवनानं वजनावर नियंत्रण ठेवता येतं. मसूरची डाळ, काळ्या बीया, शेवग्यांच्या शेंगा यांसारख्या भाज्या खायला हव्यात.

बीन्स, शेंगा, शेंगदाणे, बिया, नट बटर, अंडी, ग्रीक दही, दूध आणि सोया उत्पादने जसे की टोफू, टेम्पेहमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.

नॉन स्टार्ची भाज्यांमध्ये ब्रोकोली, शिमला मिरची, फूलकोबी, मशरूम, टोमॅटो, गाजर, वांगी, काकडी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात. यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

मटार, बटाटा, मक्का आणि विंटर स्क्वॅश  यांचा स्टार्ची व्हेजिटेबल्समध्ये समावेश होतो.  वजन कमी करण्यासाठी या भाज्यांचा आहारात समावेश करा.

🤙 8080365706