
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे कार्यालयीन सचिव डॉ. संजय विष्णू पोवार – वाईकर यांची नुकतीच निवड करणेत आली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खासदार श्रीमती सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर बाल मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. व्ही. हरी यांच्या मान्यतेने राष्ट्रीय समनव्ययक अपेक्षा देवराजू, व महाराष्ट्र मुख्य समनवयक नीला लिमये यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये जवाहर बाल मंच कार्यरत आहे. लोकशाही, सर्वधर्मसमभाव, स्त्री- पुरुष समानता आणि जातीव्यवस्थेचे निर्मुलन ही संविधानाने दिलेली मूल्ये आहेत.
सात ते अठरा वयोगटातील मुला-मुली पर्यंत ही मूल्ये पोहचवण्याचे काम जवाहर बाल मंच करणार आहे. जवाहर बाल मंच कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय करण्यासाठी व संघटना ची मूल्ये तळागाळात पोहचवण्यासाठी जवाहर बाल मंचचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून डॉ. संजय पोवार – वाईकर यांची निवड करण्यात आली आहे.
