बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF आणि SDRF च्या टीम तैनात

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. या चक्रीवादळाचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. चक्रीवादळामुळे होणारा धोका लक्षात घेता केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वच सतर्क आहेत. NDRF च्या 17 टीम आणि SDRF च्या 12 टीम गुजरातमध्ये तैनात आहेत.

त्याचबरोबर नौदलाची 4 जहाजे स्टँडबाय ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून किनाऱ्यालगत राहणाऱ्या 74,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वादळमुळे किनारपट्टीवर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह 9 राज्यांना बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही 9 राज्ये आहेत.

🤙 8080365706