
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. आज पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांना इशारा दिला आहे.

आगामी निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलंय.आगामी निवडणुका सोबत लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा 2024 ची निवडणूकसोबत लढलीच पाहिजे. पण हे असं जर एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलत असतील. आम्ही युतीत असून ते मुख्यमंत्र्यांना असं बोललं जात असेल. त्यांच्या प्रसिद्धीवर बोललं जात असेल तर मग लोक असं म्हणतात की भाजप वेगवेगळ्या पक्षांनासोबत घेऊन आपल्याच साथीदारांना कमी करण्याचा तर प्रयत्न करत नाही? मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होत असेल. तर लोक फार विचार करून सोबत जातील, असं बच्चू कडू म्हणालेत.
