चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून बंद

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस असणार्‍या पर्यटकांचे माहेरघर म्हणून बहुचर्चित असणाऱ्या चांदोली परिसरातील चांदोली धरण आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून म्हणजे 15 जून पासून 15 आक्टोबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यामुळे हा निर्णय दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला आहे. सध्या तिथं मान्सनपूर्व पाऊस सुरु असल्यामुळे धरण प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या परिरात घनदाट जंगल असल्यामुळे अनेकदा प्राणी पाहायला मिळत असल्यामुळे पर्यटकांची अधिक गर्दी असते. चांदोली परिसरात पावसाला हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे. दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस तिथल्या परिसरात पडतो. या कालावधीत नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरू झाला, की येथील पर्यटन बंद करण्यात येते. यंदाही हे पर्यटन नियमानुसार बंद करण्यात आले आहे.आजपासून 15 ऑक्टोंबर पर्यंत हे पर्यटन आता बंद असणार आहे. चांदोलीला भेट देणाऱ्या पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलावडे व वारणा प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी केले आहे.

🤙 8080365706