
महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे दोन वर्षांमध्ये तिसरा बळी
साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील पळसंबे गावाच्या अमित प्रकाश माने वय वर्ष 23 हा तरुण महावितरणच्या गलथान कारभारामुळे मरण पावला आहे. कंत्राटी बेसिस वर काम करणारा अमित आज कामावर गेला असताना विजेच्या पोल वर चढला होता मात्र अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला आणि विजेचा धक्का लागून अमित याचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेची कल्पना महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने देण्यात आली मात्र महावितरण अधिकारी 4 तासांनंतर घटनास्थळी पोहचले. नागरिकांनी mseb वर 4 तास ठिय्या आंदोलन केले यावेळी संदीप पाटील सदन पाटील युवराज पाटील . शरद पाटील योगेश गावकर , संभाजी कुंभार, शिवाजी राऊत, सचिन जाधव इंद्रर्जित मेंगाने . शशिकांत पारगावकर . नारायण माने विनायक सनगर . संदीप गावकर , अनिल पडवळ यांनी आक्रमक भूमिका मांडत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मांडली. आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 2 वाजता अपघात घडल्याची माहिती देऊनही महावितरणचे आधिकरी 5 तास उशिरा आल्याने नागरिक संतप्त झाले. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने प्रशासनासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.. सदर घटनेचा पुढील तपास API भाडंवलकर करत आहेत. अमितचे कालच लग्न ठरले होते आणि उद्या साखरपुडा देखील होती. त्यात आज ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
