मी काँग्रेस पक्षाच्या षडयंत्राचा बळी; ब्रिजभूषण सिंह

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षावरच गंभीर आरोप केला आहे. महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ब्रिजभूषण यांनी सांगितले की, ‘मी काँग्रेस पक्षाच्या षडयंत्राचा बळी आहे.’

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरप्रकरणी येत्या दोन-तीन दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल. एका अल्पवयीन कुस्तीपटू मुलीसह एकूण 6 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह आणि इतर काही आरोपींविरुद्ध नवी दिल्ली अंतर्गत कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

🤙 8080365706