बिपरजॉय रुद्र रुपात ; वाऱ्याचा वेग वाढला

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे.

समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग 150 किमी प्रतितास आहे. हे चक्रीवादळ आता वेगाने गुजरातकडे सरकत आहेय. किनारपट्टी भागात तटरक्षक आणि एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहेत.बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह महाराष्ट्रात दिसून येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. किनारपट्टी भागातील सुमारे 30 हजार नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

🤙 8080365706