
जेवणाची चव वाढवण्यासोबत मीठ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मिठाचा वापर अनेक पदार्थात केला जातो. पण जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तर चला जाणून घेऊयात रोज किती मीठ खाल्लं पाहिजे.

मिठामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, लोकांनी आठवड्यातून एकदा तरी मीठ टाळावे. असे केल्याने शरीराला मिठापासून होणारी हानी टाळता येईल. जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड कमी खावे. स्नॅक्समध्येही मिठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे स्नॅक्स टाळावे. विशेषत: ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी कमी मीठ खावे.”
‘सर्वांनी ५ ग्रॅमपेक्षा कमी म्हणजेच दररोज १ चमचे मीठ खावे. १५ वर्षांखालील मुलांनी कमी मीठ खावे. जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. मिठाच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत लोकांनी मीठावर नियंत्रण ठेवावे. जंक फूड आणि स्नॅक्समध्ये भरपूर मीठ असते, त्यामुळे जंक फूड टाळणे उत्तम ठरेल. जेवणात मीठ कमी घालावे.”
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्यासोबतच हातपायांवर सूज येऊ शकते. यासह वारंवार तहान लागू शकते. अति प्रमाणात मीठ खाल्ल्याने कर्करोग, हृदयविकारासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत मीठ कमी खावे आणि स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा.”
