भाजप शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : आमच्यात कोणतेही मतभेद नसून भाजप शिवसेनेचे सरकार चांगले सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनांना आर्थिक पाठबळ दिलेल आहे त्यामुळे आम्ही इतक्या जोमाने काम करू शकतो, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात दिली आहे.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापुरातील तपोवन मैदानावर करण्यात आल होत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहणार होते.परंतु अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. फडणवीस यांच्या तब्बेतीच कारण यावेळी देण्यात आलं.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. शिवसेनेच्या जाहिरातीतून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो गायब झाल्याने फडणवीस यांनी दौरा रद्द केला असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत सगळं ठीक आहे का असा प्रश्न त्यांना विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आमच्यात कोणतेही मतभेद नसून आमचं सरकारी व्यवस्थित सुरू असल्याचं सांगितलं.आम्ही आमचं काम करत राहणार असून विरोधक आरोप जरी करत असेल तरी आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही जेवढे आरोप होतील त्यापेक्षा दुपटीने काम करून उत्तर देऊ असंही यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

🤙 8080365706