
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. आता याबाबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.

प्रकृतीच्या कारणामुळे देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज कोल्हापूरचा नियोजित दौरा होता. पण त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. कानाचा त्रास होत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित रद्द केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांना विमान प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आणि त्यामुळे कोल्हापूर पर्यंतचा विमान प्रवास फडणवीस यांनी टाळला आहे. आणि म्हणूनच ते कोल्हापूरच्या नियोजित दौऱ्यावर येणार नाहीत, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
