एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने घेतली; उदय सामंत

कोल्हापूर : “देशात लोकांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच ठरवलं असावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांघिकपणे काम करतायत. दोघांनी केलेल्या कामाची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने घेतली आहे. या सर्वेमुळे आमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना-भाजप युतीचे हे सांघिक यश आहे” असं रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.

“संकल्पना बदलण्यापेक्षा सरकार कसं चालतं हे महत्त्वाचं आहे. देवेंद्रजी हे युतीमध्ये आमचे नेतेच आहेत. पाच वर्षे त्यांनी सक्षमपणे महाराष्ट्र चालवलाय. मागच्या अडीच वर्षात सगळीकडे स्पीड ब्रेकर होते” अशा शब्दात उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

🤙 8080365706