
रोज ब्रश केल्यानंतर आणि महागड्या टुथपेस्टचा वापर केल्यानंतर अनेकांचे दात पिवळेच दिसत असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय अवलंबू शकता.

ऑईल पुलिंग हा दातांची स्वच्छ करण्यासाठी एक पारंपारीक उपाय आहे. ऑईल पुलिंग केल्यानं तोंडातील तेल चारही बाजूंना फिरत आणि तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्याही कमी होते. ऑईल पुलिंगसाठी तुम्ही सुर्यफुलाचं तेल, तिळाचं तेल किंवा नारळाचं तेल वापरू शकता. यासाठी एक चमचा तेल घ्या आणि तोंडात १५ ते २० मिनिटांसाठी ठेवा.
फळांची सालं दात स्वच्छ करण्यासाठी उत्तम ऑप्श्न आहेत. केळी, संत्री, लिंबाच्या सालीनं हळूहळू आपल्या दातांवर घासा. जवळपास २ मिनिटं रगडल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा. फळांच्या सालीत सायट्रिक एसिड असते. ज्यामुळे दात पांढरेशुभ्र दिसण्यास मदत होते.
फळं भाज्यांच्या सेवनानं दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. अननस, स्ट्रोबेरी या पदार्थांच्या सेवनानं दात चांगले होण्यास मदत होते. रिसर्च गेटच्या एका अभ्यासानुसार अननसामधील ब्रोमेलॅन नावाचे एंजाइम दातांचा पिवळेपणा दूर करते. दात सतत पिवळे होत असतील आणि घरगुती उपायांनी दात पांढरे करणं कठीण वाटत असल्यास डेंटिस्टची मदत घ्या आणि योग्य ट्रिटमेंट घेऊन दातांची काळजी घ्या.
बेकिंग सोडा दातांवरचे डाग घालवण्यासाठी फायदेशीर ठरतो. यातील हायड्रोजन पेरोक्साईड एक नॅच्यूरल ब्लिचिंग एंजट आहे जे बॅक्टेरीयांना मारण्यास मदत करते एक मोठा चमचा बेकींग सोडा आणि दोन चमचे हायड्रोजन पेरोक्साईड घ्या आणि दोन्ही व्यवस्थित एकत्र करून या पेस्टनं दात स्वच्छ करा.
