
यवतमाळ; वाशीम लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा आहेच. कारण या मतदारसंघातील विद्यमान खासदार शिवसेनेच्या भावना गवळी शिवसेना सोडून गेल्यानंतर आता येथे भक्कम स्थितीमध्ये फक्त कॉंग्रेसच आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आमचा दावा आहेच, असे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, या मतदारसंघावरील दावा आम्ही आता सोडणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यावर अन्याय झाला नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले, यावर मी बोलणं योग्य राहणार नाही. कारण हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.
