
मुंबई : माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामाची पद्धत यात बराच फरक आहे. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नसून, राज्यात काम करणार असल्याची स्पष्टोक्ती विरोधी पक्षनेते आमदार अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, सातारा लोकसभेला कोण उमेदवार हे इतक्यात सांगता येणार नाही. अनेक उमेदवार आमच्यासमोर आहेत. कोणी गेले म्हणून पक्ष संपत नाही. जिल्ह्यातील काही ठिकाणी नवीन नेतृत्व उभे करू. कारण महाविकास आघाडीचे जागा वाटप व्हायचे आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवारच येथून विजय होईल, असे अजितदादांनी सांगितले.
