
मुंबई : राज्यातील गद्दार सरकारची ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले, तर सांभाळून राहा, अशी मिश्किल टीका खासदार सुप्रिया सुळे केली आहे.

मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात नागरिकांशी संवाद साधत होत्या त्यावेळी त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. त्या म्हणाल्या की, रॅडिसन हॉटेलमध्ये राहण्याचे निमंत्रण दिले तर सांभाळून राहा, विचार करा. गद्दारांना खाजगी हॉटेल लागले, प्रायव्हेट खाजगी विमानसुद्धा लागले. गद्दारी करताना कोणालाही, असे वाटले नाही की आपल्या मतदारसंघात जावे, लोकांना विचारावे. असेही त्या म्हणाल्या आहेत.
