जंगालत कितीही प्राणी एकत्र आले तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही; देवेंद्र फडणवीस

नांदेड : नांदेडमध्ये आयोजित सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआडीवर जोरदार हल्लाबोल केला. आता काही लोक एकत्रित येऊन भाजप-सेनेला पराभूत करू असे म्हणत आहेत.पण जंगालत कितीही प्राणी एकत्र आले तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शहा यांची नांदेडमध्ये सभा घेतली तर अशोक चव्हाण म्हणाले, भाजपाला शंका आहे नांदेड मध्ये लोकसभा जिंकतील. अशोक राव तुमची मजल टूजी, थ्रीजी आणि सोनियाजीपर्यंत आहे. काँग्रेसला थोडं यश मिळालं तरी त्यांच्या डोक्यात हवा जाते. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हटले असे चव्हाण म्हणाले, मात्र मी त्यांना सांगतो महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी राजे पॅटर्न चालतो आणि हा पॅटर्न मोदीजींनी आणला आहे

🤙 8080365706