
नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 50 आमदार बाहेर पडले नसते तर ते आमदार राष्ट्रवादीनं पाडले असते असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडूण आणण्यासाठी शिवसेनेचे आमदार पाडले जाणार होते, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं काय म्हणाले बावनकुळे? एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 50 आमदार बाहेर पडले नसते तर ते आमदार राष्ट्रवादीनं पाडले असते असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
