सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालण्याचे फायदे

आरोग्याच्या दृष्टीने गवतावर चालण्याचे बरेच फायदे आहेत. यामुळे केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर तणाव देखील कमी होतो. चला तर, जाणून घेऊया सकाळी गवतावर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे

सकाळी गवतावर अनवाणी पायांनी फिरणे म्हणजे पायांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे पाय आणि गुडघे यांचे स्नायू मोकळे होतात आणि पायांना आराम मिळतो

ग्रीन थेरपीचा मुख्य भाग म्हणजे हिरव्यागार गवतावर बसणे किंवा अनवाणी पायांनी चालणे. सकाळी दवाने भिजलेल्या गवतावर चालणे चांगले मानले जाते. पायाखालच्या मऊ पेशींना जोडलेल्या कोशिकांचा व्यायाम झाल्यामुळे मेंदूला आराम मिळतो.

सकाळी अनवाणी पायांने चालण्याने मनाला देखील विश्रांती मिळते. सकाळची ताजी हवा, सूर्यप्रकाश, हिरवळ आपल्या दृष्टीला आणि मनाला ताजेतवाने करते. या वातावरणात फिरण्याने आपल्याला बर्‍याच आरामदायी वाटते आणि व्यक्ती डिप्रेशनपासून देखील दूर राहते.