लोकसभे करीता काँग्रेसकडुन बाजीराव खाडे यांना उमेदवारी देण्याची मागणी

बालिंगा/मोहन कांबळे; कुंभि कासारी नागरी समिती आयोजित लोकसभा निवडणुकीसाठी बाजीराव खाडे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी ” आपली माती आपला माणूस” ही टॅगलाईन घेऊन “विठाई चंद्रा हॉलमध्ये” मेळावा आयोजित करण्यात आला होता.

सदर मेळाव्यास हजारोच्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शंकराव पाटील शिंगणापूरकर हे होते.

यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी बाजीराव खाडे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये गोकुळचे संचालक विश्वास नारायण पाटील, बाळासाहेब खाडे ,सुहास खाडे ,अमर पाटील शिंगणापूरकर ,तसेच पंचायत समितीचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, दादू मामा कामीरे, प्रकाश हांडे तसेच यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाजीराव खाडे यांचा परिचय देऊन उच्चशिक्षित सुशिक्षित शेतकऱ्याचा सुपुत्र, शेतीमध्ये विविध प्रयोग करणारा शेतकरी ,गांधी घराण्याची एकनिष्ठ असणारा प्रियंका गांधी यांच्याशी असलेले निष्ठा गावागावातील संपर्क, स्वतःच्या गावाच्या विकासासाठी झटणारा सच्चा सेवक यालाच उमेदवार मिळावी व आपण त्यांना नक्की निवडून देऊ अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

त्याचबरोबर हा मतदारसंघ 1999 पासून काँग्रेसकडे नाही, पण आत्ता या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे विधानसभेचे आमदार पी.एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव वहिनी तसेच विधानपरिषदचे आमदार सतेज पाटील, आमदार जयवंत तासगावकर हे काँग्रेसचे आमदार असून या मतदारसंघांमध्ये 40 जिल्हा परिषद मतदार संघ येतात त्यापैकी जवळपास 22 ते 25 जिल्हा परिषद मतदार संघावर काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे पाहिजे आणि त्याची उमेदवारी बाजीराव खाडे यांनाच मिळावी अशी एक मुखी मागणी करण्यात आली यावेळी स्वतः उमेदवार बाजीराव खाडे त्यानी बोलताना सांगितले की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेसची मूळ तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे आपण ही उमेदवारी मागणी करत आहे तसेच आज मेळाव्यास जमलेले लोक पाहून आपण भारावून गेल्याचे त्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या मेळाची प्रास्ताविक प्राध्यापक टि.एल. पाटील सर यांनी केले. या मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांसह प्राध्यापक टी. एल.पाटील, संभाजी ज्ञानू पाटील ,वसंत खाडे, शंकराव पाटील शिंगणापूरकर, दर्शन खेडेकर, एस के पाटील, दादा मामा कामीरे, सर्जेराव ज्योती पाटील, शाहू काटकर ,दिनकर पाटील, सत्यजित सुरेश पाटील, सुरेश शामराव सूर्यवंशी, अमर पाटील शिंगणापूरकर ,प्राध्यापक गौतम जाधव, सौ.सिमा चाबूक, सूर्यकांत दिंडे ,प्रकाश सुतार व यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील हे उपस्थित होते.