संभाजी कोरे यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : “समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रो.प्रा.लि.यांच्या वतीने देण्यात येणारा व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार संभाजी कोरे यांना जाहीर करण्यात आला आहे.

समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रो.प्रा.लि.यांच्या अंतर्गत सुरु असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत अभियानामध्ये समाजातील व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबाला या त्रासातून बाहेर पडण्यासाठी संभाजी कोरे यांनी मदत केली व त्या कुटुंबांना नवसंजीवनी दिली.

संस्थेच्या या व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन त्यांनी सामाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्था रविवार २५ जून रोजी ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ ह्या पुरस्काराने सन्मानित करणार आहे.