आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे क्रिडाई कडून सादरीकरण

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाजवळील जागेत अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर महाराष्ट्र शासनाने मंजूर केले आहे. या सेंटरसाठी शासनाने १०० कोटीचा निधी मंजूर केला असून, या सेंटरचा आराखडा कोल्हापूरातील प्रसिध्द आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी तयार केला आहे. या आराखाडयाची माहिती जनतेला व्हावी या करीता क्रिडाई कोल्हापूरच्या तर्फे सादरीकरणाचा कार्यक्रम राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत व आर्किटेक्ट सुनिल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कोल्हापूरातील सुप्रसिध्द आर्किटेक्ट सुनिल पाटील यांनी तयार केलेल्या आराखाडा हा इको फ्रेंडली असून या सेंटरपासून नैसर्गिक हानी होणार नाही या पध्दतीन तयार करण्यात आला असून या सेंटरमध्ये ऑडीटरम्, कॉन्फरन्स हॉल, छोटया प्रमाणात प्रदर्शन हॉल, पार्किंगची सोय अशा विविध पध्दतीचा समाविष्ट असलेला आराखडा तयार केला असून आजच्या कार्यक्रमात या आराखाडयाचे आर्किटेक्ट सुनिल पाटील यांनी सुंदर असे सादरीकरण सादर केल. या कन्व्हेंशन सेंटरच्या कामाला लवकरच सुरवात होणार असून एक वर्षाच्या आत ह्या सेंटरचे काम पुर्ण होणार असल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या सेंटर विषयी मनोगत व्यक्त करताना राजेश क्षिरसागर म्हणाले हे सेंटर मंजूर करण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाचे सहकार्य लाभले असून राजगोपाल देवरा साहेब, नगर विभागाचे सचिव भूषण गगराणी साहेब यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. तसेच हे सेंटर लवकरात पूर्ण होत असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचे असणारे महत्वाचे दोन प्रश्न म्हणजे शहराची हद्दवाढ व खंडपीठ होणार असल्याचे आश्वासन दिले.क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी हे सेंटर लवकरात व्हावे या करीता क्रिडाईच्या वतीने शुभेच्छा देऊन कोल्हापूरमध्ये या सेंटरला लागून असलेल्या जागेत एक्झिक्शन सेंटर व्हावे यासाठीचे पत्र राजेश क्षिरसागर यांना दिल्याचे सांगितले. याबाबतीत सकारात्मक निर्णय घेत असल्याचे आश्वासन राजेश क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. आजच्या या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदिप मिरजकर तसेच क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी व सभासद त्याचप्रमाणे कोल्हापूर शहारातील जवळपास ३० असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी सचिव संदिप मिरजकर यांनी सर्वाचे आभार मानले.