राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली

नवी दिल्ली : आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने दिल्लीत राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यानंतर शरद पवार यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. शरद पवार यांच्या या घोषणा म्हणजे धक्कातंत्राचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली आहे. पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे.