अमित शाह यांनी शिवसेना फोडली ; संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नाही. भाजपचे नेते अमित शाह आणि दिल्लीतील भाजप नेत्यांनीच शिवसेना फोडली आहे. मुंबईचा ताबा घेण्यासाठी आणि मुंबईवरील मराठी माणसाचं वर्चस्व कमी करण्यासाठीच भाजप नेते अमित शाह यांनी शिवसेना फोडल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मीडियाशी बोलताना राऊत यांनी हा आरोप केला. विशेष म्हणजे अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यापार्श्वभूमीवर राऊत यांनी हा बॉम्ब टाकला आहे.

शिवसेनेसारखा पक्ष फोडणं आणि शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करणं, मुंबईवर शिवसेनेची आणि मराठी माणसाची पकड ढिली करणं हे भाजपचं गेल्या अनेक वर्षापासूनचं टास्क आहे. ते त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करायचं असेल तर शिवसेना फोडली पाहिजे, हे त्यांच्या मनात होतं. पण शिवसेना अशी फुटू शकत नाही हेही त्यांना माहीत होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह पाच सहा लोकांचा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. पण त्यांची ताकद पाच ते सहा आमदारांपेक्षा अधिक नसावी. पण नंतर जे चित्र तयार झालं. ते करण्यात भाजपचं दिल्लीचं नेतृत्व आघाडीवर होतं. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव करून हा पक्ष फोडण्यात आला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

🤙 8080365706