बिपरजॉय चक्रीवादळ आणखीन तीव्र होणार

रत्नागिरी : मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली आहे. मान्सूनने आपली वाटचाल पुढे सुरु केली आहे. आता कधीही मान्सून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ आज त्याचे भीषण रूप दाखवणार आहे. हे चक्रीवादळ पुढच्या २४ तासांत अत्यंत तीव्र होणार आहे.

यामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 630 किलोमीटरवर अंतरावर आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या किनारी भागात जोरदार वारे वाहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच किनारपट्टीवर पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. IMD ने मच्छिमारांसाठी इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

🤙 8080365706