विधानसभा आणि लोकसभेला किती जागा जिंकायच्या याचं टार्गेट भाजपने ठरवलं…

नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासाठी भाजपने आपलं टार्गेटही फिक्स केलं आहे. विधानसभा आणि लोकसभेला किती जागा जिंकायच्या याचं टार्गेट भाजपने ठरवलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याची माहितीही दिली आहे. तसेच शिंदे गटाचं काय होणार याची माहितीही त्यांनी दिली आहे.

भाजपने 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख नेमले आहेत. युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ही यंत्रणा उभी केली आहे. आमच्यासारखीच ताकद आम्ही शिंदे यांच्या उमेदवारांसाठीही लावू. आम्ही 200 प्लस विधानसभा आणि 40 प्लस लोकसभा निवडून आणण्याचं टार्गेट ठेवलं आहे. महाविकास आघाडीला पराभूत करून आम्ही सत्तेत येऊच, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

🤙 8080365706