
केदारनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील केदारनाथ मंदीर परिसरात सकाळी हिमस्खलन झाल्याचं बातमी समोर आली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही वित्तीय आणि जीवितहानी झालेली नाही. गेल्यावर्षी २०२२ मध्ये केदारनाथ यात्रेमध्ये दोनदा अशा प्रकारे हिमस्खलन झालं होतं. यानंतर यंदा देखील पुन्हा हिमस्खलन झालं आहे.
