
कोल्हापूर : औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे कोल्हापुरात हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

या संघटनांचे अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी जमलेल्या नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे जमलेली गर्दी पाहून पोलीस प्रशासनदेखील सतर्क झालं आहे.
हिंदुत्ववादी संघटना या पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशाप्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या.
