जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार व कविता बी. अग्रवाल, प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या मार्फत आज दि. 6 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, कोल्हापूर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

वृक्षारोपणाची सुरुवात कविता बी. अग्रवाल, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी कोल्हापूर मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रितम पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांनी केले.

🤙 8080365706