‘शाहू’चे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत हे अभिमानास्पद; सुहासिनीदेवी घाटगे

कागल ; शाहू साखर कारखान्याचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत.ही अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ या वर्षातील शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमवेळी त्या बोलत होत्या .यावेळी १०८सभासदांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप केले. त्या पुढे म्हणाल्या, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शेतकरी,कर्मचारी केंद्रबिंदू ठेवूनच धोरणे राबविली. त्याचबरोबर त्यांच्या परिवाराचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हा त्यांच्या कामकाजाचा दृष्टिकोन होता. ३४वर्षापूर्वी त्यांनी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सभासदांच्या ५०५१मुलांना झाला आहे.ग्रामीण भागातील मुलांना शहरातील दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात. यासाठी त्यांनी कारखाना शिक्षण संकुल, वसतिगृह काढले. त्यानंतर राजे समरजितसिंह घाटगे व सौ. नवोदिता घाटगे यांनी त्यामध्ये भर घालून यशश्री इंग्लीश मेडियम स्कुल, राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीसुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी. या उद्देशाने सुरू केली आहे.याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे.यावेळी संचालक यशवंत माने,सचिन मगदूम,सुनिल मगदूम,संजय नरके आदी उपस्थित होते. स्वागत फायनान्स मॅनेजर आर .एस. पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी मानले.

शाहू’ची शिष्यवृत्तीधारक शिक्षणासाठी इंग्लंडला

यावेळी मौजे सांगावची शिष्यवृत्तीधारक ऋचिता पाटील हिचा एम.टेक साठी युनिव्हर्सिटी इंग्लंड येथे निवड झाल्याबद्दल श्रीमती घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला. तिला डिप्लोमा व डिग्री अशी सलग सहा वर्ष 21500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेत मुलांच्या तुलनेत मुली आघाडीवर आहेत.त्यांना प्रोत्साहन म्हणून शाहू साखर कारखान्यामार्फत संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून मुलांच्या तुलनेत जादा शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.ही फार आनंदाची बाब आहे.त्यांच्या धोरणाचा परिपाक असे प्रतिपादन यावेळी श्रीमती घाटगे यांनी केले.

🤙 8080365706