
पुणे -राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन करणे, विद्यार्थ्यांची सतत उपस्थिती टिकविणे व शिक्षणाचा दर्जा उचांवण्यासाठी 4 हजार 860 केंद्र प्रमुखांची पदे मंजूर करण्यात आली आहेत.

यात 2 हजार 384 पदांची विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांच्या केंद्र प्रमुख पदावर नियुक्त्या करण्यात येणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 6 ते 15 जून अशी मुदत देण्यात आलेली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.
