
कोल्हापूर : माणूस निसर्गाचे अपरिमित नुकसान करून पृथ्वीला विनाशा कडे घेऊन जात आहोत. त्यामुळे निसर्गाची हानी टाळण्यासाठी पर्यावरण पूरक जीवन जगणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या राज्यशास्त्र विषया अंतर्गत ‘महाराष्ट्राची संकल्पना आणि लघु संशोधन प्रबंध सुलभ लेखन पद्धती’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेच्या “पर्यावरण अनुकूल राहणीमान आणिपर्यावरण पूरक कौशल्य आधारित प्रयोग ”या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे होते, यावेळी उपकुलसचिव डॉ.संजय कुबल,उपकुलसचिव सी.एस.कोतमिरे यासह विद्यार्थी, समन्वयक, सहा.प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व सेवक उपस्थित होते.
डॉ.शिंदे म्हणाले की,मानवाने स्वार्थी प्रवृतीने स्वतःच्या स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी निसर्गाचा नियम मोडला. निसर्ग आणि जीवसृष्टी सगळ्यांसाठी तयार झालेली आहे.त्यामध्ये माणसाने स्वार्थ पाहिला त्यामुळे मानवाने निसर्गाला लुबाडणे सुरु केले.अन्न,पाणी आणि हवा या तीन गोष्टीची मानवाला जगण्यासाठी आवश्यकता आहे.त्याचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.अन्ना ची नासाडी,पाण्याचा मुबलक वापर व वृक्ष तोड या गोष्ठी आपण टाळल्या पाहिजेत.गतिमान जीवन युगामध्ये आवश्यक गरजा पाहूनच गरजांची पूर्तता केली पाहिजे.निसर्गाची लयलूट करून भौतिक सुखाच्या मागे लागून आपले जीवन सुखाचे बनवत आहोत हा विचार गैर आहे. यातून पृथ्वीला आपण विनाश्याच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहोत. पर्यावरण पूरक जीवन जगण्याचा विचार आपण केला पाहिजे.तरच पर्यावरणाची हानी टाळू शकतो. मालमत्ता व संपत्ती आहे म्हणून निसर्गाची लुट करू नये असे डॉ.शिंदे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रास्ताविक प्रा.डॉ.सचिन भोसले,पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केली व आभार डॉ.चांगदेव बंडगर यांनी केले.
