
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत. याची जय्यत तयारी सुरु आहे.

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्यातील लाखो शिवभक्तांसाठी एक डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा असतो. 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पुर्वतयारीची पाहणी संयोगीताराजे छत्रपती यांनी केली आहे.यावेळी गडावरील कचरा शिवभक्तांसोबत गोळा करुन खाली आणण्यात आला. गडांचा राजा मानला जाणाऱ्या रायगडवर 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मूर्तीला अस्सल सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे.
