बालिंगा येथे ७ जून रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम

बालिंगा : मोहन कांबळे/ मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभायानाअंतर्गत शासकिय योजनांची जत्रा जनकल्याणकारी योजना सर्व सामान्यांचे दारी म्हणजेच शासन आपले दारी हा कार्यक्रम बालिंगा येथे बुधवार दि ७ जुन रोजी सकाळी १०.०० वाजता लिंबाई हॉल दोनवडे येथे करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी आयोजित केला आहे.

तरी या योजनेचा जनतेने लाभ घ्यावा असेही कळविले आहे. तरी बालिंगा मंडल विभागातील सर्व गावातील शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गांवचे सरपंच,उपसरपंच , सदस्य, सेवा सोसायटी चे सर्व संचालक मंडळ, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी हजर रहावे असे एका लेखी पत्राद्वारे आवाहन केले आहे.

🤙 8080365706