
मुंबई : रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज होता. तो हुकला आहे. यामुळे आता महाराष्ट्रात मान्सूनला पोहोचण्यास विलंब होणार आहे.

केरळमध्ये तीन जून नंतर आणि महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज होता. परंतू केरळमध्ये येण्यास अद्याप तीन ते चार दिवस लागू शकतात असा हवामान विभागाचा अंदाज आला आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून येण्यास १५ जून उजाडण्याची शक्यता आहे. या साऱ्या घडामोडींवर विविध शहरांचा पारा वाढू लागला आहे. यामुळे तिथे मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.
